योग संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगभरात Yoga Festival किंवा Yoga Conference नावाची शेकडो संंमेलने भरत असतात. योगाची जन्मभूमी असलेल्या भारतात अशी संमेलने क्वचितच झाली आहेत. जी झाली त्यांपैकी काही ही :-

  • जनार्दनस्वामी यांनी योगप्रसारार्थ, १९४८ साली अमरावतीला १ले योगसंमेलन भरवले.
  • १९५१ च्या संक्रांतीस तेच स्वामी नागपुरात आले. नागपूरला त्यांनी दुसरे ’भारतीय योग संमेलन’ आयोजित केले.
  • वाशीच्या योग विद्या निकेतन आणि यमुना फाऊंडेशन यांनी संयुक्तरीत्या महाराष्ट्रातील पहिले योग साहित्य संमेलन २७ मे २०१२ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे आयोजित केले होते. हे साहित्य संमेलन योगप्रसार्थ झालेल्या आधीच्या दोन संमेलनांपेक्षा वेगळ्या उद्देशाने भरवले होते असे दिसते.
  • बिहारमधल्या मुंगेर येथे १९६३मध्ये स्थापन झालेल्या बिहार योग विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी म्हणजे इ.स.२०१२मध्ये २३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथे एक विश्व योग संमेलन झाले. उद्‌घाटन बिहारचे राज्यपाल डी.वाय. पाटील यांनी केले होते.

पहा : साहित्य संमेलने