Jump to content

योगसिद्धी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योगसिद्धीसाठी आवश्यक साधनभूत गोष्टी

[संपादन]

योगाची पूर्णता संपादन करण्यासाठी चार साधनभूत गोष्टींचे एकत्रित सहकार्य परिणामकारक ठरते.

०१) शास्त्र - सत्याचे ज्ञान, तत्त्व, प्रक्रिया इ. चे ज्ञान

०२) उत्साह - त्या ज्ञानाच्या आधारे करायचे सातत्यपूर्ण प्रयत्न.

०३) गुरू - गुरुकडून मिळणारे मार्गदर्शन, आध्यात्मिक अनुभव, उदाहरण आणि गुरूंचा प्रभाव

०४) काळ - साधनेसाठी व्यतीत केलेला काळ []

योगसिद्धीचे प्रकार

[संपादन]

आत्मसिद्धी -

केवळ सच्चिदानंद अशा परमतत्त्वाचा समाधीस्थितीतील अनुभव.[]

नैष्कर्म्य सिद्धी -

अहंकारविरहित आणि कर्मफळाची आशा न बाळगता केलेले कर्म

अष्टमहासिद्धि []

क्र सिद्धी परिणाम
१. अणिमा (शरीर अत्यंत सूक्ष्म होणे),
२. महिमा (शरीर मोठे होणे),
३. लघिमा (शरीर वजनांत हलके होणे),
४. प्राप्ति (सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशी त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणे),
५. प्राकाश्य (परलोकांतील अदृश्य विषयांचे ही ज्ञान होणे),
६. ईशिता (शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इतरांच्या ठिकाण असणारी प्रेरणा ताब्यांत येणें; सत्ता; प्रभाव; (कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् सामर्थ्य),
७. वशिता (विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणे),
८. प्राकाम्य किंवा कामावसायिता (ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणे).

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sri Aurobindo (1999). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 23-24. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  2. ^ a b स्वामी स्वरूपानंद (१९६०). अभंग ज्ञानेश्वरी. पावस, रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ.