योगसिद्धी
Appearance
योगसिद्धीसाठी आवश्यक साधनभूत गोष्टी
[संपादन]योगाची पूर्णता संपादन करण्यासाठी चार साधनभूत गोष्टींचे एकत्रित सहकार्य परिणामकारक ठरते.
०१) शास्त्र - सत्याचे ज्ञान, तत्त्व, प्रक्रिया इ. चे ज्ञान
०२) उत्साह - त्या ज्ञानाच्या आधारे करायचे सातत्यपूर्ण प्रयत्न.
०३) गुरू - गुरुकडून मिळणारे मार्गदर्शन, आध्यात्मिक अनुभव, उदाहरण आणि गुरूंचा प्रभाव
०४) काळ - साधनेसाठी व्यतीत केलेला काळ [१]
योगसिद्धीचे प्रकार
[संपादन]आत्मसिद्धी -
केवळ सच्चिदानंद अशा परमतत्त्वाचा समाधीस्थितीतील अनुभव.[२]
नैष्कर्म्य सिद्धी -
अहंकारविरहित आणि कर्मफळाची आशा न बाळगता केलेले कर्म
अष्टमहासिद्धि [२]
क्र | सिद्धी | परिणाम | |
---|---|---|---|
१. | अणिमा | (शरीर अत्यंत सूक्ष्म होणे), | |
२. | महिमा | (शरीर मोठे होणे), | |
३. | लघिमा | (शरीर वजनांत हलके होणे), | |
४. | प्राप्ति | (सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशी त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणे), | |
५. | प्राकाश्य | (परलोकांतील अदृश्य विषयांचे ही ज्ञान होणे), | |
६. | ईशिता | (शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इतरांच्या ठिकाण असणारी प्रेरणा ताब्यांत येणें; सत्ता; प्रभाव; (कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् सामर्थ्य), | |
७. | वशिता | (विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणे), | |
८. | प्राकाम्य किंवा कामावसायिता | (ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणे). |