येणपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येणपे हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे. येणपे गाव तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे .येथे विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत.गावाला कोणतीही नदी नसताना फक्त एका तलावाच्या आधारे ९९%रहीवासी ऊसाचे उत्पन्न घेतात.

गावची लोकसंख्या सुमारे ४ हजारांच्या आसपास आहे .गावात ग्रामपंचायत प्रशासन आहे.येणपे ग्रामपंचायती अंतर्गत माटेकरवाडी,शेवाळेवाडी,चोरमारेवाडी,माळवाडी,तळवाडी आणि येणपे असे सहा विभाग आहेत.देशातील पहिला नदीजोड प्रकल्प हा याच गावातून पुढे जाऊन वाठार येथे समाप्त होतो.

येणपे गाव हे कराड दक्षिण विधानसभा तर सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे.गावातील पिण्याच्या पाण्याची पातळी एकदम स्वच्छ व अ दर्जाची आहेे.[ संदर्भ हवा ]