येगोर गैदार
Appearance
येगोर तिमुरोविच गैदार (रशियन:Его́р Тиму́рович Гайда́р; १९ मार्च, १९५६:मॉस्को, सोवियेत संघ - १६ डिसेंबर, २००९:ओदिंत्सोव रैओन, मॉस्को ओब्लास्त, रशिया) हे रशियाचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि लेखक होते. हे १५ जून ते १४ डिसेंबर, १९९२ दरम्यान रशियाचे काळजीवाहू पंतप्रधान होते.
त्यांनी सोवियेत संघाच्या विघटनानंतर रशियाच्या अर्थतंत्राला झटकउपाय लागू केले. याबद्दल त्यांची प्रशंसा झाली तसेच निर्भत्सनाही केली गेली.