यु.एस.एस. कॅलिफोर्निया (बीबी-४४)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

यु.एस.एस. कॅलिफोर्निया ही अमेरिकेची युद्धनौका होती. टेनेसी वर्गातील दोन युद्धनौकांमधील एक असलेले हे लढाऊ जहाज पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या आरमाराच्या हाती आले होते. या युद्धनौकेने आपली सगळी कारकीर्द प्रशांत महासागरात केली. अमेरिकेच्या प्रशांत तांड्याची ही मुख्य नौका होती. ही नौका पर्ल हार्बरवरील हल्ल्यात बुडाली होती परंतु तिला पुन्हा तरंगते करुन तिला युद्धात धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४७मध्ये हिला भंगारात विकण्यात आले.