युसेन बोल्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युसेन बोल्ट
Usain Bolt Olympics cropped.jpg
देश जमैका ध्वज जमैका
जन्मनाव युसेन सेंट लिओ बोल्ट
जन्म दिनांक २१ ऑगस्ट, १९८६ (1986-08-21) (वय: २९)
जन्म स्थान ट्रेलॉनी, जमैका
उंची १.९६ मीटर (६ फूट ५ इंच)
वजन ८८ किलो

युसेन सेंट लिओ बोल्ट (जन्म: २१ ऑगस्ट १९८६) हा एक जमैकन धावपटू आहे. युसेन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे. त्याच्या नावावर सध्या १०० मीटर्स (९.५७ सेकंद), २०० मीटर्स (१९.१९ सेकंद) हे दोन व्यक्तीगत विश्वविक्रम तसेच जमैकन संघातल्या इतर धावपटूंसोबत ४ x १०० मीटर्स रीले शर्यतीमध्ये विश्वविक्रम (३७.१० सेकंद) नोंदवला गेला आहे. २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा मध्ये त्याने ३ सुवर्णपदके पटकावली.

त्याच्या अफाट वेगामुळे युसेन बोल्टला लाईटनिंग बोल्ट (विजेचा तडाखा) हा खिताब मिळाला आहे.