युसूफ मेहेरअली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
युसूफ मेहरअली
युसूफ मेहरअली
जन्म नाव युसूफ जाफर मर्चेंट
जन्म २३ सप्टेंबर, १९०३
मृत्यू २ जुलै, १९५०

युसूफ मेहर अली (मूळ नाव युसूफ झफर मर्चंट; २३ सप्टेंबर, १९०३:मुंबई, महाराष्ट्र - २ जुलै, १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छ भागातील होते. मेहरअली यांच्या आजोबांचा मुंबईमध्ये कापडाचा व्यवसाय होता. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले. कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसीडेंसी युथ लिग संघटनेत सामील झाले. ते सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी 1942च्या चले जाव आंदोलनात महत्त्वाची भूमिका राबवली होती. 'चले जाव' ही घोषणादेखील त्यांनीच दिली होती. [१]

१९४२मध्ये महात्मा गांधी इंग्रज सरकार विरोधात एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत होते. तत्पूर्वी त्यांनी यासंदर्भात सल्लामसलत करण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा केली. यात मेहरअली देखील होते. आंदोलनासाठी रणनीती आखण्यात येत होती त्याला साजेसं म्हणून 'क्विट इंडिया' ही घोषणा द्यावी असे यूसूफ मेहरअलींनी गांधींना सुचवले. गांधींनाही कल्पना प्रचंड आवडली.[१]

सायमन कमिशन विरोधात यूसुफ आणि त्यांच्या तरुण क्रांतिकारकांनी दिलेला नारा इतका बुलंद होता की, त्याचा आवाज भारताच्या कोनाकोपऱ्यात पोहचला. या घटनेने यूसुफ मेहरअलींचे नाव देशभरात पोहोचले. महात्मा गांधींसोबत अनेकांच्या तोंडी सायमन गो बॅकची घोषणा आली. पनवेल येथील तारा येथे त्यांच्या नावे युसूफ मेहेर अली सेंटर चालवले जाते. [२] २ जुलै, १९५० रोजी वयाच्या ४७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251728:2012-09-23-20-43-16&Itemid=1. Missing or empty |title= (सहाय्य)