युरेशियन कोरल
Appearance
युरेशियन कोरल किंवा कोरल, घोंघल्या फोडया टीलवा, बडी टीलवा, मोठा पाणलावा, साईत्र बाड्डा, चाउंग, करढोक, पोचा, बक, सिस, करडी कुरवळ, कुरल किंवा मोठा टीलवा (इंग्लिश:Eurasian Curlew; हिंदी:गुनियार, गोंध, गौर, बडा गुलीन्दा) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने मोठया कोंबडीएवढा असून रंग वाळूसारखा गडद उदी असतो. हा जलचर पक्षी आहे. त्यावर काळ्या, पिंगट व बदामी रंगाच्या काडया व ठिपके असतात आणि पाठीखालचा व शेपटीजवळचा भाग पांढरा असतो. उडताना हे पांढरे डाग ठळक दिसतात. आतल्या बाजूला वळलेली लांब, बारकी चोच लक्षणीय असते. नर मादी दिसायला सारखेच असतात.
वितरण
[संपादन]ते भारत, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे असतात.
निवासस्थाने
[संपादन]ते दलदली, समुद्रकिनारे आणि चिखलाणी अश्या ठिकाणी वास्तव्य करतात.
चित्रदालन
[संपादन]-
युरेशियन कोरल, भिगवण, महाराष्ट्र.
-
युरेशियन कर्ल्यू, चिल्का सरोवर, भारत
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली