युद्धनौका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएसएस आयोवा या युद्धनौकेवरील प्रचंड तोफखान्याच्या माऱ्याने खालील समुद्राचे पाणी हादरले आहे.

युद्धनौका (इंग्लिश:Battleship) प्रचंड आकाराची चिलखती नौका लढाऊ नौका आहे. यावर मोठ्या आकार व पल्ल्याचा तोफखाना असतो. याशिवाय यांवर छोट्या तोफा व विमानविरोधी तोफाही असू शकतात. एकोणिसाव्या शतकाअखेर तसेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीस युद्धनौका कोणत्याही आरमाराचा मुख्य भाग असायच्या. दुसऱ्या महायुद्धात त्यांची जागा विमानवाहू नौकांनी घेतली. १९९० च्या दशकात शेवटच्या युद्धनौकांना निवृत्ती देण्यात आली. नौकेच्या नियंत्रण कक्षाला ब्रिज असे म्हणतात. नौका चालवायला अनेक लोकांची आवश्‍यकता असते. हेलिकॉप्टर उतरू शकतील, असे हेलिपॅड असते..

  • सागरावरून सागरावर हल्ला करता येणारे क्षेपणास्त्र
  • विमानविरोधी क्षेपणास्त्र
  • सागरावरू जमिनीवर मारा करता येणारे क्षेपणास्त्र
  • पाणबुड्यांचा विनाश करणारे टॉर्पेडो
  • मीडियम फ्रिक्वेन्सी सोनार - या यंत्रणेद्वारे सागरतळ परिसर पाहून त्यात काही धोकादायक गोष्ट आहे, का याची सूचना दिली जाते.
  • विद्युत, आण्विक अथवा डिझेल इंजिने वापरली जातात
  • वेगाने जाऊ शकते