युटा बीच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युटा बीचवर चालून जाणारे पहिले काही अमेरिकन सैनिक. यातील अनेक सैनिक किनाऱ्यावर ५० फूट पुढे जायच्या आत मृत्युमुखी पडले.

युटा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी सगळ्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश दूव्ह आणि व्हिरे नद्यांच्या पश्चिमेस असलेली मोठी पुळण आहे.

६ जून, इ.स. १९४४ रोजी अमेरिकन सैन्य येथे मोठ्या संख्येने उतरले व तेथील तटबंदीवर हल्ला करीत पुळण हस्तगत केली. त्यानंतर हजारो इतर सैनिक येथून शेरबोर्ग आणि फ्रांसच्या इतर भागांतून घुसले.