यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

’कर्दळीवन सेवा संघा’ने २८ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा व परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यांतील अनुभवांची देवाण घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हे संमेलन योजले होते.

कैलास मानसरोवर यात्रा, कर्दळीवन परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, श्रीदत्त परिक्रमा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, स्वर्गारोहिणी यात्रा, द्रोणागिरी परिक्रमा, गिरनार परिक्रमा, पिठापूर – कुरवपूर परिक्रमा, लाहिरी महाशय राणीखेत गुहा परिक्रमा, पंचकैलास – आदि कैलास, किन्नर कैलास,श्रीखंड कैलास, मणि महेश कैलास, पंचकेदार – केदारनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ, मदमहेश्वर या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहेत. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत, सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि माहितीपट, चित्र प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा साहित्य संमेलनात झाले.


हे सुद्धा पहा[संपादन]