Jump to content

म्युनिक करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९३८चा म्युनिच करार हा जर्मनी आणि युरोपीय सत्तांमधील करार होता. या कराराद्वारे युनायटेड किंग्डम, फ्रान्सइटली या युरोपातील राष्ट्रांनी जर्मनीला चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलॅंड हा प्रदेश परस्पर बहाल केला. या कराराला चेकोस्लोव्हेकियाची मान्यता तर नव्हतीच पण त्यांना या बैठकीस आमंत्रितही केले गेले नव्हते.

जर्मनीच्या म्युनिच (म्युन्शेन) शहरात २९ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर, इ.स. १९३८च्या मधील रात्रीत झालेला हा करार म्हणजे युरोपीय राष्ट्रांनी जर्मनीचे लांगूलचालन केल्याचे उदाहरण समजले जाते.