Jump to content

मोरेकुरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरेकुरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातीलपालघर तालुक्यातले गाव आहे.

  ?मोरेकुरण

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
लोकसंख्या ७१८ (२०११)
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• महा ४८
साक्षरता ८५.३२

भौगोलिक स्थान

[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून हे गाव बोईसर राज्य मार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर ५ किमी अंतरावर आहे.

लोकजीवन

[संपादन]

येथे मुख्यतः वंजारी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या स्थायिक झालेले आहेत. गावापासाच्या शेतांत खरीप हंगामात कोलम, तायचुंग, कोळपी, आयआर८ इत्यादी जातींचे भात पिकविले जाते. भातशेती करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रथम राब केला जातो.सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर शेतातील एका खाचरात भातबियांची पेरणी केली जाते. भाताचे रोप साधारण वीस ते पंचवीस दिवसानंतर मोठे झाल्यावर प्रत्येक खाचरात पावसाचे अथवा पाऊस कमी पडला तर मोटारपंपाद्वारे विहिरीचे पाणी साधारण अर्धा गुडघाभर साचवून भारतीय पद्धतीने अथवा जपानी पद्धतीने शेतीतील सर्व खाचरांत भातरोपांची लावणी ऊर्फ रोपणी केली जाते.काही वेळेस भाताची रोपे अपुरी पडल्यास ती अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन ती उर्वरित खाचरांत लावतात.

संदर्भ

[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc