Jump to content

मोटार वाहनाचे नोंदणीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्येक वाहनाचे नोंदणीकरण करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. वाहनाचा मालक ज्या विभागात वास्तव्यास आहे,त्याच विभागाचे आर.टी.ओ. कार्यालयात त्या वाहनाचे नोंदणीकरण करणे महत्त्वाचे आहे. नोंदणी न करता मोटार वाहन सार्वजनिक ठिकाणी चालवल्यास मो.व. कायदा कलम ३९/१९२ प्रमाणे दंडात्मक कारवाई होऊ शकते. आर.टी.ओ. कार्यालयाचे नोंदवहीत वाहनाचा मालक म्हणून ज्या व्यक्तीची नोंद झालेली आहे, त्या व्यक्तीवर त्या वाहनाबाबत जबाबदारी टाकली जाते. वाहन मालकाने राहण्याचा पत्ता बदलल्यास ३० दिवसाच्या आत नवीन पत्ता आर.टी.ओ. कार्यालयात कळविणे बंधनकारक आहे. एका आर.टी.ओ. कार्यालयात एखादे वाहन नोंदणी केल्यानंतर त्या वाहनाची देशात इतरत्र ते वाहन पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु एका राज्यामध्ये नोंदणी केलेले वाहन एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी अन्य राज्यामध्ये ठेवण्यात आले असेल तर अशा वेळी वाहनाच्या मालकाने पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे (क ४७ मो.वा. कायदा)

वाहनाचे नोंदनीकरण करतेवेळी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

  • गाडी खरेदी केल्याची पावती(सेल सरटीफिकेट)
  • रहिवासी दाखला.
  • विम्याचे प्रमाणपत्र(इंन्सुरंस सरटीफिकेट)
  • परदेशातून गाडी गमावलेली असल्यास कस्टम पावती.

नोंदणीकरणाची पावती हरविले किंवा नष्ट झाल्यास गाडीच्या मालकाने संबंधित पोलीस ठाणे व आर.टी.ओ. कार्यालय यांना कळवले पाहिजे. त्यानंतर संबंधित आर.टी.ओ. कार्यालयास अर्ज दिल्यानंतर त्याची दुसरी प्रत मिळू शकते.