मोईन शाकीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. मोईन शाकीर राजकीय विचारवंत म्हणून ओळखले जातात.[१] ते औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. मुसलमानातील सुधारणावादी चळवळीत त्यांनी दीर्घकाळ काम केले. असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. हमीद दलवाई यांच्यासोबत त्यांनी काही काळ कार्य केले. भारतीय मुसलमान, खिलाफत चळवळ, महात्मा गांधी, मौलाना आझाद, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत.[२] प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मते ते केवळ इंग्रजीत लिहीत होते. लिखाणाची ही भाषा त्यांनी ठरवून निवडली होती. इकोनॉमिक पेलिटिकल विकलीमध्ये ते नियमित लिहीत असत. त्यांनी मुस्लिम विषयाच्या अनुषंगाने अनेक पुस्तके लिहिली आहेत. मुस्लिम राजकारणाचे ते अभ्यासक म्हणून देशभरात परिचीत होते. १९८० साली औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.

प्रकाशित ग्रंथ[संपादन]

  • गांघी, आझाद अँड नॅशनलिझम[३]
  • मुस्लिम अँड इंडियन नॅशनल काँग्रेस (1988)
  • स्टेट अँड पॉलिटिक्स कंटेम्परी इंडिया (1986)
  • खिलाफत टू पार्टिशन
  • इस्लाम इन इंडियन पॉलिटिक्स (1983)
  • सेक्युलॅरिझम ऑफ मुस्लिम बिहेविअर (1973)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ https://www.epw.in/journal/1980/26/reviews-uncategorised/nationalism-and-communalism.html.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  2. ^ https://www.epw.in/journal/1987/32/roots-specials/moin-shakir-memoriam.html.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  3. ^ https://www.amazon.in/Books-Moin-Shakir/s?ie=UTF8&page=1&rh=n%3A976389031%2Cp_27%3AMoin%20Shakir.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)