मॉसेल बे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॉसेल बे दक्षिण आफ्रिकेतील एक शहर आहे. केप टाउनपासून ४०० किमी पूर्वेस असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५९,०३१ होती.

३ फेब्रुवारी, इ.स. १४८८ रोजी बार्थोलोम्यू डायस युरोपमधून भारताला समुद्री मार्ग शोधत असताना त्याने केप ऑफ गुड होपला वळसा घातल्यावर येथे पहिल्यांना नांगर टाकला होता.