Jump to content

मॅान्टेस्क्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉन्टेस्क्यू या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅान्टेस्क्यू

मॅान्टेस्क्यू (फ्रेंच: Charles-Louis de Secondat, Baron de La Brède et de Montesquieu; १८ जानेवारी १६८९,ला ब्रेद, जिरोंद - १० फेब्रुवारी १७५५, पॅरिस) हे फ्रान्समधील एक प्रसिद्ध विचारवंत होतेे. त्याच्या विचारांनीच फ्रेंच राज्यक्रांतीची पायाभरणी झाली.

उमराव घराण्यात जन्मलेले मॅान्टेस्क्यू हे पेशाने वकील होते. त्यांनी विविध शासन पद्धतींचा तैलनिक अभ्यास करून 'दि स्पिरिट आॅफ लाॅज' (कायद्याचे मर्म) हा ग्रंथ लिहिला. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची तिन्ही क्षेत्रे स्वतंत्र्य हवीत त्यायोगे समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' त्यांनी मांडला. त्यांनी अनियंत्रीत राजसत्तेला विरोध दर्शवला. ते ब्रिटिश राज्यपद्धतीने प्रभावित झाले होते. कारण त्यात राजेशाही, सामंतशाहीलोकशाही या तिन्ही पद्धतींच्या गुणांचा समन्वय साधला गेला होता. फ्रांसमधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलने आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव फ्रांसमधील बुद्धिवादी लोकांवर पडला होता. अमेरिकेने त्यांचा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' स्वीकारला.

बाह्य दुवे

[संपादन]