मॉडर्न रिव्ह्यू
Appearance
मॉडर्न रिव्ह्यू या नियतकालिकाची स्थापना - १९०७ मध्ये कलकत्ता येथे झाली. १९९५ सालपर्यंत हे नियतकालिक प्रकाशित होत होते.[१]
संस्थापक, संपादक - श्री.रामानंद चटर्जी. ('प्रवासी' या बंगाली भाषेतील नियतकालिकाचे संपादक) चटर्जी संपादन हे उच्च जीवनकार्य आहे असे मानत असत.
हिंदुस्थानातील सर्व विचारधारांना व्यासपीठ लाभावे या हेतुने या मासिकाची स्थापना करण्यात आली होती.
या मासिकाची प्रेरणा भगिनी निवेदिता यांची होती. त्यांनी सातत्याने दोन वर्षे या मासिकात लिखाण केले होते. [२]
मराठीशी अनुबंध
[संपादन]या मासिकामध्ये वा.गो.आपटे मराठी पुस्तकांचे परीक्षण करत असत. आपटे यांच्यापुढे संपादनाच्या बाबतीत चटर्जी यांचा आदर्श होता. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Modern Review (Calcutta)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-04-14.
- ^ वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद-कन्या निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.
- ^ मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; तिसरी आवृत्तीसंबंधी निवेदन, प्रकाशन वर्ष १९५२