मेरी वोल्स्टनक्राफ्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेरी वोल्स्टनक्राफ्ट

मेरी वोल्स्टनक्राफ्ट (/wʊlskrɑːft/; २७ एप्रिल, इ.स. १७५९ - १० सप्टेंबर, इ.स. १७९७) या अठराव्या शतकातील लेखिका व तत्त्वज्ञ होत्या. त्यानी महिला हक्कासंदर्भात लिखाण केले. त्यांनी आपल्या संक्षिप्त कारकिर्दीत, कादंबरी, प्रदीर्घ लेखन, प्रवासवर्णन, फ्रेंच राज्यक्रांतीवर लेखन, इतिहासाचे एक आचार पुस्तक, आणि लहान मुलांसाठीचे पुस्तक असे विविध प्रकाराचे लेखन केले. मेरी वोल्स्टनक्राफ्ट यांनी आपल्या 'अ व्हिंडीकेशन ऑफ राइट्स ऑफ वूमेन' या पुस्तकात (इ.स. १७९२) त्या, स्त्री पुरुष नैसर्गिकरीत्या कनिष्ठ नाहीत असे प्रतिपादन करतात व स्त्रियांमध्ये केवळ शिक्षणाची कमतरता असल्याची पुष्टी करतात. याशिवाय त्यांनी असे सुचवले की पुरुष आणि स्त्रिया या दोघांना विवेकी व्यक्ती म्हणून वागविले पाहिजे आणि सामाजिक व्यवस्था ही विवेकावर स्थापित आहे अशी कल्पना करते.