सप्टेंबर १०
(१० सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
सप्टेंबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५३ वा किंवा लीप वर्षात २५४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८२३ - सिमोन बॉलिव्हार पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९७ - लॅटिमरची कत्तल - पेनसिल्व्हेनियामध्ये शेरिफच्या टोळक्याने २० निःशस्त्र खाणकामगारांना ठार मारले.
- १८९८ - लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
विसावे शतक[संपादन]
- १९३९ - दुसरे महायुद्ध - कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने रोममध्ये ठाण मांडले.
- १९५१ - युनायटेड किंग्डमने इराणविरुद्ध आर्थिक निर्बंध लादले.
- १९६१ - १९६१ इटालियन ग्रांप्री - चालक वोल्फगांग फोन ट्रिप्सच्या फेरारीला अपघात ट्रिप्स आणि १३ प्रेक्षक ठार.
- १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
- १९६७ - जिब्राल्टरने स्पेनमध्ये विलिन होण्यास नकार दिला.
- १९७४ - गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७५ - व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
- १९७६ - झाग्रेबजवळ ब्रिटिश एरवेझच्या हॉकर सिडली ट्रायडेंट आणि आयनेक्स-एड्रियाच्या डग्लस डी.सी.-९ प्रकारच्या विमानांची टक्कर. १७६ ठार.
एकविसावे शतक[संपादन]
- २००२ - स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
जन्म[संपादन]
- ११६९ - अलेक्सियस दुसरा कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
- १४८७ - पोप जुलियस तिसरा.
- १६२४ - थॉमस सिडेनहॅम, इंग्लिश वैद्य.
- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू.
- १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते.
- १८९२ - आर्थर कॉम्प्टन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक.
- १९३४ - रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
- १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार.
मृत्यू[संपादन]
- २१० - चिन शि ह्वांग, चिनी सम्राट.
- ९५४ - लुई चौथा, फ्रांसचा राजा.
- १३०८ - गो-निजो, जपानी सम्राट.
- १९४८ - फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
- १९६४ - पं.श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
- १९७५ - जॉर्ज पेजेट थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८३ - फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- राष्ट्र दिन - जिब्राल्टर.
- शिक्षक दिन - चीन.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर १० - सप्टेंबर ११ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर महिना