मेधा आलकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मेधा आलकरी ह्या मराठीत प्रवासवर्णने लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्यांच्या 'सूर्य होता रात्रीला : वीस देशांची बखर' या पुस्तकाला चांगले अभिप्राय आणि आणि चांगली प्रसिद्धी मिळाली. 'या पुस्तकामुळे पर्यटन व्यवसायावर गदा येईल की, काय असे वाटावे इतके हे पुस्तक बारकाईने लिहले असल्याचे' अच्युत गोडबोले म्हणाले.

मेधा आलकरी या मुंबईच्या डुंगरसी गंगजी रुपारेल काॅलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांनी काही काळ आंध्र बँकेत नोकरी केली आहे. त्यांचे शालेय शिक्षण परळच्या आर.एम. भट या शाळेतून झाले होते.

‘मस्त भटकंती’च्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात आलकरी ह्यांचे 'आनंदाचा फेरा' नावाचे प्रवासवर्णन आले आहे.

मेधा आलकरी आणि जी.बी. देशमुख यांनी 'गर्जे मराठी' ह्या सुनीता गानू आणि आनंद गानू यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.