मॅडिसन स्क्वेअर गार्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅडिसन स्क्वेअर गार्डन हे (Madison Square Garden) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मोठे बंदिस्त प्रांगण (इंडोअर अरेना) आहे. हे मॅनहॅटनमधल्या सातव्या व आठव्या ॲव्हेन्यूला फुटणाऱ्या एकतिसाव्या ते तेहतिसाव्या स्ट्रीट्‌स दरम्यान आहे. या इमारतीच्याखाली जमिनीखालचे पेन स्टेशन हे लोकलचे रेल्वे स्टेशन आहे.

येथे बास्केटबॉलचे, आइस हॉकीचेमुष्टियुद्धाचे सामने भरवले जातात. तसेच संगीताच्या मैफली, सर्कस आणि मोठी भाषणे होतात.. २८ सप्टेंबर २०१४ रोजी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये अमेरिकेतील मूळभारतीय असणाऱ्या माणसांना उद्देशून एक भाषण झाले होते. अमेरिकेबाहेरील इतर कोणत्याही देशाच्या शासनप्रमुखाने येथे भाषण देण्याची ही पहिलीच वेळ होती.

गुणक: 40°45′2″N 73°59′37″W / 40.75056°N 73.99361°W / 40.75056; -73.99361

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत