मुहम्मद दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अल्ला-उद्दीन मुहम्मद दुसरा हा मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याचा सत्ताधिश होता. इ.स. १२०० ते इ.स. १२२० पर्यंत त्याने गादी चालवली.

चंगीझ खानची स्वारी[संपादन]

इ.स. १२१८ मध्ये व्यापाराची परवानगी मागणाऱ्या चंगीझ खानच्या व्यापारी चमूला शाह मुहम्मदच्या एका अधिकाऱ्याने ठार केले. या कृत्याबद्दल शाह मुहम्मदने या अधिकाऱ्याला शिक्षा न करता पाठीशी घातले. हा प्रकार कानावर पडल्यावर चंगीझने सुमारे दोन लाख सैन्यानिशी मध्य आशियावर हल्ला केला. या युद्धातील पराभवानंतर शाह मुहम्मद इराणच्या दिशेने पळून गेला. पुढे तेथे परागंदा अवस्थेतच त्याला मृत्यू आला.

हे लेख देखील पहा[संपादन]