मिसूरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिसूरी
उगम ब्राउअर्स स्प्रिंग, मॉंटाना
मुख मिसिसिपी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश मॉंटाना, उत्तर डकोटा, दक्षिण डकोटा, आयोवा, मिसूरी, कॅन्सस, नेब्रास्का (अमेरिका)
उगम स्थान उंची २,७७४ मी (९,१०१ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १३,७१,०१० किमी
धरणे गॅरिसन धरण, ओआहे धरण, फोर्ट पेक धरण, फोर्ट रॅन्डल धरण, इतर ११ छोटी धरणे

मिसूरी नदी अमेरिकेतील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. मॉंटाना राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावून ही नदी पूर्वेस व नंतर दक्षिणेस वाहते. ३,७६७ किमी (२,३४१ मैल) प्रवास केल्यावर ही नदी सेंट लुइसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. मिसूरी नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १३,००,००० किमी इतके असून त्यात अमेरिकेतील दहा राज्ये आणि कॅनडातील दोन प्रांतांतील प्रदेश समाविष्ट आहे.