मिनामोटो नो योशियासू
Appearance
मिनामोटोनो योशियासू (जपानी:源義康1139-1195) हे मिनामोटो कुटुंबातील एक पुरुष होते. यांचे वडील योशिकुनी होते. हे मिनामोटो कुळातील आशिकागा शाखेचे पूर्वज होते. योशियसु एक समुराई योद्धा होते. त्यांनी ११६० मधील हेजी विद्रोहात भाग घेतला होता. त्यांनी सम्राट निजो आणि त्याचे वडील निवृत्त सम्राट गो-शिराकावा यांना वाचवले. त्यांचा मोठा भाऊ, मिनामोटोनो योशिकुनीप्रमाणे, त्यांनीही बंडखोरीनंतर बाजू बदलली आणि ११८० मध्ये गेनपेइ युद्धाच्या वेळी मिनामोटो कुळात सामील झाले. त्यांनी आपल्या भावासोबत ११८३ मध्ये आवझूच्या युद्धात युद्ध केले . ११८५ मध्ये युद्ध संपल्यानंतर ते पुन्हा क्योतो येथील त्यांच्या वाड्यात गेले.११९५ मध्ये त्यांचा तेथेच मृत्यू झाला.
कुटुंब
[संपादन]- वडील: मिनामोटोनो योशिकुनी
- आई: मिनामोटोनो आरिफुसाची मुलगी
हे सुद्धा पहा
[संपादन]- सेईवा गेंजी