मा.म. देशमुख
जीवन
[संपादन]प्रा. मा.म. देशमुख हे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले नाव आहे. ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमधून इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.
संपूर्ण महाराष्ट्रात ते "मा. म." म्हणून परिचित होते आणि त्यांनी मध्ययुगीन भारताचा खरा इतिहास संशोधनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला. त्यांच्या कार्याने बहुजन चळवळीला आणि इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली. त्यांनी इतिहासाच्या संशोधनातून मध्ययुगीन भारताचा खरा चेहरा लोकांसमोर आणला, विशेषतः बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली. त्यांचे कार्य बहुजन चळवळीशी निगडित होते आणि त्यांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखनाला नवे परिमाण दिले.[१]
समाजकार्य
[संपादन]मा.म. देशमुख हे एक महान तत्त्वज्ञ, इतिहास संशोधक होते. विविध पुस्तके व व्याखाने देऊन त्यांनी लोकजागृती केली.[ संदर्भ हवा ]
१९८८ मध्ये यवतमाळ येथील नगर वाचनालयात साम्यवादी विचाराच्या संघटनांनी ‘जातीयवाद विरोधी मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्यातील प्रमुख वक्ते कॉ.गोविंद पानसरे व अध्यक्ष मी होतो. या प्रसंगी कॉ.पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ” या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्याच विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. १९९९मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने ‘शिवराज्य पक्षा’ची घोषणा झाली. या नव्या पक्षाच्या अध्यक्षपदी प्रा.मा.म..देशमुखांची निवड झाली. या पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी मामं.नी पत्रकार परिषद घेतली. दूरदर्शनवर तिचे प्रसारण झाले. त्यामुळे मामं.ना पहिल्यांदा व्यापक प्रसारमाध्यम मिळाले[१]
प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताच्या इतिहासातील अनेक धक्कादायक पण वास्तव पैलू समाजासमोर यावे, यासाठी मा. म. देशमुख आयुष्यभर प्रस्थापितांशी भिडत राहिले. ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आणि अनेकांची वैचारिक दैवते त्यांच्या देवघरांसह हादरली. पण, या पुस्तकातील संदर्भ जितके सडेतोड होते तितकेच अचूकही होते. हे पुस्तक आले तेव्हा मा. म. देशमुख नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये इतिहास शिकवत. त्यांच्या या पुस्तकातील मुद्दे खोडता येत नाहीत म्हणून नागपुरातील काही प्रतिगामींनी देशमुखांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न केला.[२]
या कारस्थानाबाबत देशमुखांच्या विद्यार्थ्यांना कळताच हजारो तरुण त्यांच्या मदतीला धावले. जिथे देशमुखांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न झाला त्याच ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘प्रेमयात्रा’ काढली. पुढे या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली. पण, न्यायालयात अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी ही बंदी उठविण्यास शासनाला भाग पाडले. त्यांच्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ना नफा ना तोटा तत्त्वावर त्याची विक्री करण्याचा निर्णय देशमुखांनी घेतला. त्यातून पुस्तकाने प्रचंड खपाचा उच्चांक गाठला. या घटनेतून देशमुख यांची वैचारिक कीर्ती देशभर पोहोचली. हजारो दाणे असणारे कणीस जमिनीच्या गर्भात उगवावे असे वाटत असेल तर आधी कुठल्यातरी एका बीजाला स्वतःची आहुती द्यावी लागते. झापडबंद बहुजनांचे डोळे उघडण्यासाठी मा. म. देशमुख स्वतः ते बीज झाले. ‘‘इतिहास फक्त राजे-रजवाड्यांचा नसतो, तो लढणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या बहुजनांचाही असतो,’’ असे ते निर्भयपणे सांगत. प्रा. मा. म. देशमुख हे एक बहुजनकेंद्री आक्रमक प्रचारक व इतिहास संशोधक होते. महाराष्ट्राला पुरोगामी मार्गावर न्यायचे असेल तर लेखणीसारखे साधन नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. म्हणून, देशमुखांनी राष्ट्र जागृती लेखमाला हा प्रकल्प सुरू केला. त्याअंतर्गत अनेक ग्रंथ लिहिले.[२]
लिहिलेले ग्रंथ
[संपादन]राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत. त्यांतील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. पण अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी हायकोर्टाकडून बंदी उठवली. त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजेना नफाना तोटा तत्त्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.[२]
- अभिनव अभिरूप
- अभ्यास असा करावा
- जय जिजाऊ
- प्राचीन भारताचा इतिहास
- बहुजन समाज आणि परिवर्तन
- बौद्ध धम्म आणि शिवधर्म
- भांडारकर झॉंकी है, शनिवारवाडा बाकी है
- मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली, हायकोर्टाने बंदी उठवली.)
- मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
- मनुवाद्याशी लढा (नववी आवृती)
- मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
- मराठ्यांचे दासीपुत्र (संपादित)
- युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा
- रामदास आणि पेशवाई
- वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
- राष्ट्रनिर्माते
- शिवराज्य
- शिवशाही
- सन्मार्ग
- समाज प्रबोधन
- साहित्यिकांची जबाबदारी
मा.म.देशमुख यांच्या भाषणाच्या व्हीडिओ सी.डी
[संपादन]- अविद्येपेक्षा कुविद्या भयानक
- आरक्षण भाग १
- आरक्षण भाग २
- कांशीराम
- क्रांतिकारी भाषण
- छत्रपती शिवराय
- डॉ. पंजाबराव देशमुख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज
- बौद्ध धम्म आणि शिवधर्म
- ब्राह्मणी थोतांड
- न्या. सावंत मुलाखत
- हिंदू राष्ट्रवाद
मा.म.देशमुख यांचे विचार
[संपादन]मी स्पष्टवक्तेपणा वापरून इतिहास संशोधन समोर आणण्याचे काम केले आहे व ते अखंड सुरू आहे. "ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर केव्हा ही होईल सपाट" पासून ते "ज्या घरी पुस्तकांचे कपाट आणि काम्पुटर, ते घर होईल जगात अग्रेसर" असे बदलत्या काळानुसार पुरोगामी विचार त्यांनी मांडले आहेत.
पुरस्कार
[संपादन]मा.म.देशमुख यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.त्यातील काही ठळक पुरस्कार खालीलप्रमाणे.
- 'दै.जनता' पेपराचा महानायक जीवन गौरव पुरस्कार.
निधन
[संपादन]ज्येष्ठ इतिहासकार मा.म. यांचे दि. बुधवार, १९ मार्च २०२५ पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते नागपूर येथील कोतवाल नगरात राहत होते. [१][२]
बाह्य दुवे
[संपादन]- [[१]]
- ^ a b c "Senior historian : ज्येष्ठ इतिहासकार मा.म. देशमुख यांचे निधन". civicmirror.in. 2025-04-01 रोजी पाहिले.
- ^ a b c d "व्यक्तिवेध : प्रा. मा. म. देशमुख". Loksatta. 2025-03-21. 2025-04-01 रोजी पाहिले.