मासावा
Jump to navigation
Jump to search
मासावा किंवा मित्सिवा (गीझ भाषा: ምጽዋዕ;मिसिवा, अरबी भाषा: مصوع;मसावा, इटालियन भाषा:मस्सौआ) किंवा पूर्वीचे बत्सी[१] (गीझ भाषा: ባጽዕ;बासी) किंवा बडी (अरबी भाषा: بِضع) हे इरिट्रियामधील लाल समुद्रकिनाऱ्यावर असलेले शहर व बंदर आहे.
इ.स. १९९१मध्ये इरिट्रिया देश उदयास येण्याआधी या शहरावर अक्सुमी साम्राज्य, उम्मयी खिलाफत, बेजा जमाती, ऑट्टोमन साम्राज्य, इजिप्त, युनायटेड किंग्डम, इटली आणि इथियोपियाची सत्ता होती. इ.स. १९००पर्यंत हे शहर इटलीच्या इरिट्रिया प्रांताची राजधानी होते. त्यानंतर राजधानी अस्मारा येथे हलविण्यात आली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ Matt Phillips, Jean-Bernard Carillet, Lonely Planet Ethiopia and Eritrea, (Lonely Planet: 2006), p.340.