मासानोबु फुकुओका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मासानोबु फुकुओका

मासानोबु फुकुओका (२ फेब्रुवारी, इ.स. १९१३ - १६ ऑगस्ट इ.स. २००८) हे जपानमधील एक शेतकरी आणि तत्त्वचिंतक होते. त्यांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेती तसेच दुर्लक्षित जमिनीची सकसता वाढविण्यासाठी संशोधन केले. रासायनिक खते वापरणे, शेतीची आवर्जून मशागत करणे, त्यातील तण उपटून काढणे यासारख्या पद्धतींऐवजी फुकुओका यांनी विविध संस्कृतींमध्ये जी नैसर्गिक पद्धतीची शेती केली जाते त्यावर आधारित शेतीचे एक नवे तंत्रज्ञान विकसित केले.

फुकुओका यांनी अनेक जपानी पुस्तके लिहिली असून, विविध शास्त्रीय विषयांवर शोधनिबंध प्रकाशित केले. १९७० नंतरच्या त्यांनी दूरचित्रवाहिनीवर लघु चित्रपट आणि इतर ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यांचा कार्याने अनेक व्यक्तींनी प्रभावित होउन नैसर्गिक अन्‍नाचा व निसर्गस्नेही जीवनशैलीचा स्वीकार केला.