मावळ आणि नेरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रात अनेक मावळ आणि नेरे आहेत. उदाहरणार्थ:

  • पवन मावळ (पवना नदीचा मावळ)
  • गुंजण मावळ (गुंजवणी नदीचा मावळ)
  • इतर...पहा : बारा मावळ

हे मावळ म्हणजे नक्की काय ह्याबद्दल स.आ.जोगळेकर ह्यांच्या 'सह्याद्री' ह्या पुस्तकांत सदर्भ आहे, की नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो, त्याला मावळ म्हणतात. अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा(=पर्वतामधले खोरे) किंवा दरी(=लहान दरा) म्हणतात.

नेर हा नदीचे खोरे या अर्थाचा प्रत्यय आहे. हा स्वतंत्र शब्द नाही.

नेर प्रत्यय लागून बनलेली काही ग्रामनामे -

  • अमळनेर
  • जामनेर
  • जुन्नेर - जुने नेरे(?)
  • पारनेर

पहा:जिल्हावार नद्या