माळटिटवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कल्का, हरयाणा मधील माळटिटवी
पिवळ्या गाठीची टिटवी

माळटिटवी किंवा पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:Yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तीराएवढा असतो. त्याचे पाय लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते. तिचे पांढरे पोट व काळे डोके असते. डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते. उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. हे पक्षी समूहाने राहतात.

वितरण[संपादन]

हे पक्षी भारतात हरयाणा आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतात. तसेच पश्चिम बांगला देश, पाकिस्तान सिंध आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात.

निवासस्थाने[संपादन]

ते धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश अश्या ठिकाणी वास्तव्य करतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली