मालविका मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मालविका मराठे (१९६७ - ७ मे, २०२०:माहीम, मुंबई, महाराष्ट्र) या दूरदर्शन-सह्याद्री या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर सन १९९१ ते २००१ पर्यंत या कालावधीत वृत्तनिवेदिका होत्या. त्यापूर्वी त्या आकाशवाणी (All India Radio)वर निवेदिका होत्या. या त्यांच्या आकाशवाणीत उद्घोषक म्हणून काम करत असतानाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी अनेक व्यावसायिक मराठी नाटकांमधेही भूमिका केल्या होत्या. नव्या संचात आलेल्या 'मोरूची मावशी' या नाटकात त्यांची भूमिका होती. मालविका मराठे यांनी काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केले होते. अनेक रंगमंचीय कार्यक्रमांच्या त्या सूत्रसंचालक असत. त्यांनी दूरदर्शनवरील 'हॅलो संखी' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सतत १२ वर्षे सूत्रसंचालन केले.