मालगुडी डेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट दी गाईड. यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. तर त्यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर आधारीत दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.

साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

हे सुद्धा पहा[संपादन]