मार्मिक (साप्ताहिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्मिक
प्रकार साप्ताहिक
विषय राजकीय
भाषा मराठी
माजी संपादक बाळ ठाकरे
स्थापना ऑगस्ट, इ.स. १९६०
पहिला अंक
देश भारत
मुख्यालय मुंबई

मार्मिक हे मराठी भाषेमधील व्यंगचित्रांनी युक्त असलेले साप्ताहिक आहे. हे साप्ताहिक मुंबईहून प्रकाशित होते.

आरंभ[संपादन]

मार्मिक सुरू करण्यापूर्वी मार्मिकाचे संस्थापक संपादक बाळ ठाकरे इ.स. १९५०च्या दशकात 'फ्री प्रेस जर्नल' या मुंबईतील वृत्तसंस्थेत चित्रकार-व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. पुढे ठाकर्‍यांनी नोकरी सोडून स्वत:चे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६०मध्ये मार्मिक साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाचेमार्मिक हे नाव ठाकर्‍यांना त्यांचे वडील केशव सीताराम ठाकर्‍यांनी सुचविले. व्यंगचित्रात्मक असलेले हे मराठीतील पहिले साप्ताहिक ठरले. साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रकाशनसमारंभास अनंत काणेकरही उपस्थित होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.