Jump to content

मार्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्डी हे सोलापूर जिल्हात समावेश असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील एक खेडेगाव आहे. या गावातील यमाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.

श्री यमाई देवस्थान, मार्डी (सोलापूर)

[संपादन]

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळख असलेल्या यमाई देवीचे मंदिर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावी असून दरवर्षी चैत्र महिन्यातील यात्रेला भाविकांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. मार्डी या गावातील यमाई देवीचे मंदिर हे पुरातन मंदिर असून आठशे वर्षांपूर्वी या मंदिरात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. श्री यमाई देवीचे मुळपीठ (मुळस्थान) साताऱ्यातील औंध गावी असून जवळच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने मार्डी येथील यमाई देवीचे हे उपपीठ देखील लोकप्रिय आहे. यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. त्यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या मार्डी किंवा मुळपीठ म्हणजेच औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा भाविक आज देखील पाळतात. साक्षात आदिशक्तीच्या वास्तव्यामुळे मार्डीला शक्तीपीठांचा वारसा लाभला आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील शेडम चीतापूर जवळील रंगनाथ स्वामी गोसावी हे देवीचे निस्सिम भक्त होवून गेले.

श्री देवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार पद्मशाली समाजाचे कुलदैवत तथा महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणून मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो तेच मारवाडी म्हणजे सध्याचे मार्डी हे गाव आहे मार्कंडेय ऋषी यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेली ही भूमी आहे तसेच भागवत ग्रंथांमध्येही मार्डी या गावाचा उल्लेख आढळतो. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर यमाई देवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक पाळतात. गुलबर्गा जिल्ह्यातील शेडम चीतापूर जवळील रंगनाथ स्वामी गोसावी हे देवीचे निस्सिम भक्त होऊन गेले रंगनाथ स्वामी गोसावी यांनी आठशे वर्षांपूर्वी मार्डी या गावात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती.

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो भाविक आई यमाई देवीच्या दर्शनासाठी मार्डी येथे येतात.