मारी कोरेली
Appearance
मारी कोरेली ही एक इंग्रज कादंबरी लेखिका होती. तिचा जन्म लंडनमध्ये झाला. तिचे खरे नाव मेरी मकाय. ती आधी पियानोवादक होती. त्यानंतर तिने कादंबरीलेखनास वाहून घेतले.
तिच्या काही कादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
- अ रोमान्स ऑफ टू वर्ल्ड्स (१८८६)
- बरॅब्बस (१८९३)
- रोज ऑफ सेटन (१८९५)
- द माय्टी ॲटम (१८९६)
- द मास्टर ख्रिश्चन (१९००)
- टेंपोरल पॉवर (१९०२)
- द यंग डायना (१९१७ )
- द सिक्रेट पॉवर (१९२१)
आलंकारिक पण कृत्रिम भाषा, भडक वर्णने, संविधानकाची अतिनाट्यात्मक मांडणी, नैतिकता आणि धर्मभावनेचे भरपूर प्रदर्शन ह्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांमुळे व्हिक्टोरियन कालखंडाच्या उत्तरार्धातील मध्यमवर्गीयांच्या मनाची पकड ह्या कादंबऱ्यांनी घेतली व कोरेलीला त्या काळी अमाप कीर्ती मिळाली.
बरॅब्बस व सॉरोज ऑफ सेटन ह्या कादंबऱ्या विशेष लोकप्रिय ठरल्या.
स्ट्रॅटफर्ड येथे ती निधन पावली.