मानसशास्त्रातील नवसंकल्पना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

मानवी वर्तनाचा शास्त्रीय रितीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. मानसशास्त्रात मानवी वर्तन निर्धारित करणा-या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मज्जासंस्था, अंत:स्त्रावी ग्रंथी, अध्ययन प्रक्रिया, प्रेरणा, भावना, विविध मानसिक प्रक्रिया इत्यादी. वेगवेगळया प्रकारची संशोधने मानसशास्त्रात सतत होत असतात. यातूनच नवनवीन शाखा व संकल्पना उदयास येतात. यातील काही नवसंकल्पना व शाखा पुढीलप्रमाणे.[१]

सकारात्मक मानसशास्त्र[संपादन]

(पॉजीटीव्ह सायकॉलॉजी) मार्टीन सेलिंग्मन (२०००) यांनी पॉ‍जिटीव्ह सायकॉलॉजी अर्थात सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची नवीन शाखा निर्माण केली. सकारात्मक दृष्टीकोण, सकारात्मक भावना, सकारात्मक विचार यांचा व्यक्तींवर, त्यांच्या कार्यावर, वर्तनावर, स्वास्थावर काय परिणाम होतो याचा अभ्यास या शाखेत केला जातो. सकारात्मक मानसशास्त्राचे मुख्य ध्येय म्हणजे मनुष्यातील नकारात्मक विचार काढून टाकून नवीन सकारात्मक विचारांची रूजवणूक करणे होय. व्यक्तीमध्ये धनात्मक गुणांची जोपासना करण्यावर सकारात्मक मानसशास्त्रात भर दिला जातो.

बोधनिक मानसशास्त्र[संपादन]

(कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी) मानसशास्त्रात मानवी वर्तन आणि त्याच्या मागे असणा-या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. बोधनिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. त्यावर संशोधने केली जातात. संवेदन स्मृती, विचार प्रक्रिया, बुध्दिमत्ता, समस्या परिहार, भाषा शिकणे, निर्णय प्रक्रिया, सृजनशीलता या सर्व प्रक्रियांना बोधनिक किंवा मानसिक प्रक्रिया असे म्हटले जाते. या प्रक्रिया मेंदूशी निगडित आहेत. त्यामुळे बोधनिक मानसशास्त्रात मानसिक प्रक्रियांचा आणि पर्यायाने मेंदूच्या कार्याचा अभ्यास केला जातो.

भावनिक बुध्दिमत्ता[संपादन]

(इमोशनल इंटेलिजन्स)- भावनिक बुध्दिमत्ता ही संकल्पना १९९५ मध्ये डॅनियल गोलमन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानी मांडली. त्यांचे 'इमोशनल इंटेलिजन्स' हे पुस्तक खूप गाजले.

	मानवी जीवनात भावनांचे अधिष्ठान कायमच अबाधित राहिले आहे. आपल्या भावनाद्वारेच आपले वर्तन बऱ्याच वेळेस निर्धारित होत असते. या सूत्राचा आधार घेऊनच गोलमन यांनी 'भावनिक बुध्दिमत्ता' ही संकल्पना मांडली. बुध्दिमत्तेच्या इतर प्रकारापेक्षा भावनिक बुध्दिमत्ता हा प्रकार काहीसा वेगळा आहे. गोलमन यांनी भावनिक बुध्दिमत्तेचे पाच घटक सांगितले आहेत.

१. स्वत:च्‍या भावना समजावून घेणे. २. स्वत:च्या भावनावर नियंत्रण ठेवणे. ३. स्वत:च्या भावना योग्य मार्गांनी व्यक्त करणे. ४. दुस-यांच्या भावना समजावून घेणे. ५. भावनांचा उपयोग कार्याला प्रेरणा देण्यासाठी करणे.

	ज्या व्यक्तीमध्ये भावनिक बुध्दिमत्ता चांगली असते ती व्यक्ती नातेसंबंध व्यवस्थित हाताळू शकते. यशामध्ये बुध्दिमत्तेचा वाटा २५टक्के असतो तर भावनिक बुध्दिमत्तेचा ७५ टक्के. भावनिक बुध्दिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स इमोशनल कोशंट मध्ये (इकयू)  मोजली जाते. कॉमन सेन्स, समज, शहाणपण, सकारात्मक वृत्ती, प्रगल्भता, नैतिकता, आत्मविश्वास, संयम, चिकाटी, सहिष्णुता, लवचिकता हे सारे व्यक्तिमत्वाचे पैलू परस्परसंबंधित असतात. त्याचा मूळ स्त्रोत भावनिक बुध्दिमत्ता हाच असतो.

इकॉलॉजिकल इंटेलिजन्स[संपादन]

'इकॉलॉजिक इंटेलिजन्स' ही संकल्पना देखील डॅनियल गोलमन यांनीच मांडली. पर्यावरणाच भान असण म्हणजे इकॉलॉजिक इंटेलिजन्स होय. या संकल्पनेत माणसामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर होणा-या दुष्परिणामांचे आकलन आणि ते कमी करण्यासाठी काय करायला हवं आहे त्याचे मार्ग शोधणे असा अर्थ यात अध्याह्रत आहे.

माईंडफुलनेस[संपादन]

माईंडफुलनेस ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. ज्यात सद्य क्षणी व्यक्ती जे आंतरिक आणि बाहय अनुभव घेते त्याच्या जाणीवेचा अंतर्भाव होतो. माईंडफुलनेस मुळे प्रत्येक क्षणाचा रस-रसुन उपभोग घेण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण होते. ध्यानधारणा किंवा इतर काही प्रशिक्षण तंत्राच्याद्वारे माईंडफुलनेस प्रक्रिया व्यक्तीमध्ये निर्माण करता येते. माईंडफुलनेसमुळे व्यक्तीची मानसिक सुस्थिती सुधारण्यास मदत होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ मानसशास्त्रातील नवसंकल्पना डॉ.एस.डी. पाटणकर दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर