माधव विश्वनाथ धुरंधर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर ( १८ मार्च १८६७  - १ जून १९४४ ) हे नावाजलेले चित्रकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना रावबहादूर हा किताब दिला.

वारसा[संपादन]

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डायरेक्‍टर असलेले धुरंधर हे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेचे उत्तम भान जागावे यासाठी धडपडत. त्यांची कन्या अंबिका हीसुद्धा एक उच्च दर्जाची चित्रकार. जे.जे.चा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली विद्यार्थिनी ठरण्याचा मान अंबिकाबाईंकडे जातो. वडील रावसाहेब धुरंधर आणि शिल्पकार फडके यांच्या हृद्य आठवणी अंबिकाबाईंनी अत्यंत आस्थेने आणि मार्मिक शब्दांत लिहिल्या आहेत. त्यांच्या पुस्तकाचे नाव : माझी स्मरणचित्रे.

लेखन[संपादन]

  • चित्रकार रावबहादुर धुरंधर यानी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आठवणींवर लिहिलेल्या पुस्तकाचे नाव : " कला मंदिरातील ४१ वर्षे"

सन्मान[संपादन]

  • मुंबईतील खार (पश्चिम) येथे 'चित्रकार धुरंधर रोड' आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.