माधवी
Appearance
माधवी ही ययातीची दुर्दैवी कन्या होती..
तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिला त्याचे गुरू गालव याला देऊन टाकली, आणि त्या दिवसापासून माधवीच्या दुर्दैवाची कहाणी सुरू झाली.
गालवानला त्याचे गुरू विश्वामित्र याला २००० मौल्यवान घोडे द्यायचे होते. त्यासाठी ऋषी गालवाने माधवीला तीन राजांना एकेक वर्षासाठी भेट दिली, व त्यांच्याकडून २०० घोडे घेतले. अजूनही ८०० घोड्यांची सोय व्हायची होती. या काळात प्रत्येक राजाला माधवीपासून मुले झाली.
८०० घोड्यांची व्यवस्था न होऊ शकल्याने, मिळालेले २०० घोडे गालवाने विश्वामित्रांना गुरुदक्षिणा म्हणून दिले व सोबत माधवीलाही दिले. जोपर्यंत माधवीला मूल होत नव्हते तोपर्यंत तिला विश्वामित्रांनी ठेवून घेतले आणि मूल झाल्यावर तिच्या पित्याकडे-ययातीकडे पाठवून दिले.
माधवीवरील मराठी पुस्तके
[संपादन]- ययाति कन्या माधवी (लेखक - अनिल काळे)
- ययातिकन्या माधवी (लेखिक - विजया जाहगीरदार