मातोश्री वेलबाई देवजी हरीया वरिष्ठ महाविद्यालय (शहाड ता. कल्याण)
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शाहु शिक्षण संस्था पंढरपूर अंतर्गत कल्याण मधील शहाड येथे हे कला, वाणिज्य महाविद्यालय उभे आहे. दानशूर समाजसेवक श्री.जयंतीभाई हरिया यांनी आपल्या मातोश्रींच्या नावे जागा दान दिल्याने या महाविद्यालयाचे नाव मातोश्री वेलबाई देवजी हरिया असे आहे. प्रा. श्री. लक्ष्मणराव ढोबळे हे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक असून कल्याण मधील संस्थेचे कार्य अध्यक्ष: श्री जयंतिभाई हरिया, सचिव: डॉ.गिरीश लटके, संचालकः श्री. एस एस शिवशरण व इतर पदाधिकारी पाहत आहेत.
सध्या या महाविद्यालयात शहाड, मोहोने,आंबिवली,कल्याण ई परिसरातील सर्व स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत असून एक नामांकित महाविद्यालय म्हणून ही संस्था पुढे येत आहे. या संस्थेमार्फत जुनियर, विधी, बी. एड या शाखा देखील सुरू केलेल्या आहेत.