मातीची चूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चूल आणि वैल (महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पारंपरिक स्वयंपाकाचे साधन)

मातीची चूल म्हणजे चिक्कण माती किंवा कुंभारी माती वापरून तयार केलेली एक छोटी बांधणी. चुलीवर लाकूडफाटा, शेणाच्या गोवऱ्या, काडीकचरा, इ. जैवभार इंधने वापरून स्वयंपाक करता येतो. हिचा आकार इंग्रजी आद्याक्षर 'U ' सारखा असतो. Uची वर्तुळाकार बंद बाजू मागच्या बाजूला आणि खुली बाजू आपल्या समोर असते. चुलीची उंची साधारण‌‌तः २५ ते ३० सें मी. असते. हिच्यावर भांडे ठेवल्यावर त्याला खाली जळणाऱ्या इंधनापासून उष्णता मिळते व भांड्यातील अन्न शिजते.

मातीची चूल

या चुलीवर वरील बाजूस, (U आकाराच्या दोन्ही टोकावर व मध्ये) सुमारे ३-४ सें मी. व्यासाचे तीन गोलाकार उंचवटे बनविलेले असतात.त्यांना 'टोणगे' असे म्हणतात. त्यांचा उपयोग भांड्यांना आधारासाठी टेकू म्हणून तसेच खालील जळणाचा धूर बाहेर निघण्यासाठी जागा देण्यासाठी होतो.

काही ठिकाणी एक तोंडाच्या (एकावेळी एकच भांडे ठेवता येणाऱ्या), तर काही ठिकाणी दोन किंवा तीन तोंडांच्या चुली वापरल्या जातात. काही ठिकाणी भाजलेल्या मातीची हातवाही (पाहिजे तिथे हलवता येणारी) चूलही वापरली जाते.

बऱ्याच ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागांत मातीच्या चुलीवर जेवण बनते. चुलीवरील जेवण हे अतिशय चवदार असते. परिणामी ग्रामीण भागातील जेवण हे चविष्ट लागते त्यामुळे लहान गावात सहलील्या गेल्यावर लोक चुलीवरच्या जेवणाची मागणी करतात.

चुलींचे प्रांंतानुसार प्रकार[संपादन]

कोकणात नरम प्रकृतीचा जांभा दगड मुबलक प्रमाणात असल्याने तेथे जांभा कापून अखंड स्वरूपाची चूल तयार केली जाते.ही चूल चुना,माती यांनी लिंपली जाते. गोमंतक बेळगाव परिसरात लाल मातीचे प्रमाण अधिक असल्याने तिथे लाल मातीच्या चुली असतात. केरळच्या काही भूभागांत खडकाळ जमीन, वाळूमिश्रित मुरूम व माती असल्याने पालापाचोळा घालून तिथल्या चुली तयार करतात. सोमनाथ वेरावळ भागात वाळूपासून चुली करतात. विजयनगर हंपी या कर्नाटकातील परिसरात शहाबादी खडकापासून केलेल्या चुली आढळतात.[१]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भोसले द.ता. लोकसंस्कृतीः बंध अनुबंध २॰१॰ पद्मगंधा प्रकाशन