Jump to content

माताहारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माताहारी

माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्‌यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवऱ्याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटावर गेली.

माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅंड्सला परत आली आणि तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली.

अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलॅंन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलॅंन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला.

माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले.

एल्सबेथ श्रागम्युल्लर हे नाव माहीत नसलं तरी त्या शिष्येचं नाव आहे मारिटा झिली ऊर्फ माताहारी, १ ९ १५ मध्ये माताहारीला हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी बेल्जियमच्या प्रशिक्षण केंद्रात एल्सबेथकडे पाठवण्यात आलं . तिने फ्रेंचांच्या उच्चपदस्थ राजकीय तसेच लष्करी वर्तुळात शिरकाव करून जर्मनीसाठी हेरगिरी करावी अशी जर्मन हायकमांडची इच्छा होती . माताहारीला तेथे पाठवण्यात जर्मन हायकमांडची आज्ञा असल्याने एल्सबेथne प्रशिक्षणासाठी दाखल करून घेतलं . हे खरं असलं तरी ती एल्सबेथची आवडती विद्यार्थिनी कधीच नव्हती . माताहारी बथ्थड डोक्याची आहे अन् ती हेरगिरीचं साधं - सोपं तंत्रही आत्मसात करू शकत नसल्याने कुचकामाची आहे , असं लवकरच तिचं मत बनलं, एल्सबेथ आगम्युल्लरचं हे मत अतिशय योग्यं होतं . माताहारीला जी काही थोडी सफलता मिळाली त्यात तिच्या बुद्धिचातुर्यापेक्षा तिच्या रूपलावण्याचा भाग जास्त होता . त्याचा वापर करून तिला जी काही माहिती मिळत होती तितकीच ती जर्मनांना देत होती . सामरिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती कोणती ह्याची जाण नसल्याने ती मिळवण्याचे प्रयत्न माताहारीकडून फारसे होत नव्हते ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच फ्रान्समधील जर्मन हेरांचं जाळं सुरक्षित ठेवण्यासाठी एल्सबेथने फ्रेंच गुप्तचर संस्थेकडे चुगली करून माताहारीचा बळी दिला . अर्थात हे अशा प्रकारचं ' डिस्कार्ड ' तंत्र आणीबाणीच्या वेळीच अन् इतर पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा तसंच आपल्या गुप्तहेर संस्थेची हानी होणार नाही ह्याची काळजी घेऊनच वापरायचे असते.