मातारो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मातारोचे बंदर

मातारो हे स्पेनच्या बार्सेलोना प्रांतामधील शहर आहे. मातारो बार्सेलोना शहरापासून ईशान्येस ३० किमी अंतरावर भूमध्य समुद्राकाठी वसलेले आहे. या शहराची लोकसंख्या २०१० साली अंदाजे १,२२,९३२ होती. यातील मोठ्या प्रमाणातील व्यक्ती शेती व संलग्न व्यवसायात आहेत.

ऑक्टोबर २८, इ.स. १८४८ रोजी स्पेनमधील पहिली रेल्वेगाडी बार्सेलोनापासून येथपर्यंत धावली.