माणिकदौंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणिकदौंडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नाशिक विभागात मोडते. गावातून शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. माणिकदौंडी येथे पिर मलिक मोहम्मद बाबा यांचे जागृत देवस्थान आहे .