माठ
माठ पाणी भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात. माठाचा उपयोग उन्हाळा ऋतूमध्ये होतो, कारण माठात पाणी थंड राहते. या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे.[१]
स्वरूप
[संपादन]माठ हे शक्यतो मातीचे असतात. माठचा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी तिवई ठेवतात. पाणी घेण्यासाठी ओगराळे असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.पाणी थंड होण्यामागे पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे.
सुगडे
[संपादन]लहान मडक्याला सुगडे असे म्हणतात, त्याचा वापर बहुतांश वेळा विधींमध्ये केला जातो.
वापर
[संपादन]पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.
फायदे
[संपादन]माठ हा स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात चांगला असते . तो इतर धातूंच्या भांडय़ाप्रमाणे कळकट नाही, रापत नाही किंवा ठेवला तर त्याला गंजही चढत नाही.
तोटे
[संपादन]काचेच्या भांडय़ाप्रमाणे जपून वापरावा लागतो