माउलब्रॉनचा मठ
Jump to navigation
Jump to search
माउलब्रॉनचा मठ हा जर्मनीतल्या माउलब्रॉन गावातील ख्रिश्चन साधूंचा मठ आहे. मध्ययुगीन उत्तर युरोपातील आज संंपूर्णावस्थेत अस्तित्वात असणारा एकमेव मठ अशी माउलब्रॉनच्या मठाची ख्याती आहे. या कारणाकरीता हा मठ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट आहे. या मठाची स्थापना ११४७ मध्ये झाली. १५५६ पासून मठात लहान मुलांची शाळा आहे. १५८६ ते १५८९ काळात तिथे योहानेस केप्लर हा खगोलशास्त्रज्ञ शिकला. याशिवाय हरमान हेसे आणि फ्रिडरिश ह्योल्डरलिन हे पुढे प्रसिद्धीस आलेले जर्मन कवीदेखील या शाळेत शिकले. मठात योहान ग्यॉर्ग फाउस्ट या सोळाव्या शतकातील रसायनशास्त्रज्ञाची प्रयोगशाळा आहे. गटेच्या फाउस्ट या काव्यातील पात्र योहान ग्यॉर्ग फाउस्टवर आधारीत आहे. माउलब्रॉनच्या मठातील मध्ययुगीन पाणी व्यवस्था लक्षणीय अाहे.