महासुंदरी देवी
Appearance
महासुंदरी देवी (?? - ४ जुलै, २०१३:रांती, मधुबनी जिल्हा, बिहार) या भारतीय लोककलाकार होत्या. या मधुबनी शैलीमध्ये चित्रे काढायच्या.
महासुंदरी देवींना शालेय शिक्षण मिळाले नव्हते. त्या लहानपणीच आपल्या मावशीकडून मधुबनी चित्रकला शिकल्या. वयाच्या सुमारे पन्नासाव्या वर्षी त्यांनी परदा पद्धत झुगारून दिली व आपली चित्रकला पसरविण्यासाठी त्या देशभर फिरल्या. महासुंदरी देवींनी महिला हस्तशिल्प कलाकार औद्योगिकी सहकार समिती या सहकारी संस्थेची स्थापना केली व त्याद्वारे हस्तकला कारीगरांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून दिल्या.
यांची मोठी मुलगी मोती कर्ना ही सुद्धा मधुबनी चित्रकार आहे.