महावेली नदी
महावेली | |
---|---|
इतर नावे | महावेली गंगा |
उगम | पोलवथुरा, श्रीलंका |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कॅंडी जिल्हा, श्रीलंका |
लांबी | ३३५ किमी (२०८ मैल) |
ह्या नदीस मिळते | महावेली |
महावेली ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती श्रीलंकेतील सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली गंगा असे म्हणले जाते.[ संदर्भ हवा ] या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवतुरा या दुर्गम गावात होतो.[१] ही नदी ईशान्य किनाऱ्यावरील त्रिंकोमालीच्या खाडीमार्गे बंगालच्या उपसागराला मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक बंदर असून जगातील खोल समुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.[२]
महावेली विकास कार्यक्रम
[संपादन]श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प असणारा महावेली विकास कार्यक्रम १९६१ साली आखण्यात आला.[३] प्रत्यक्ष कामाला सुरुवात १९६४ साली झाली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश जलविद्युत शक्ती निर्मिती, पूर नियंत्रित करणे, शुष्क क्षेत्रासाठी सिंचन सुविधा देणे, जमीनहीन आणि बेरोजगार कुटुंबांची निर्मिती करणे, मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक आणि सामाजिक संरचनेची निर्मिती करून विकास करणे. महावीली नदी स्थानिक शेती उत्पादनात वाढ आणि लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे इतर अपेक्षित उद्देशांमध्ये होते.[४]
सुरुवात
[संपादन]सन १९६१ मध्ये सिरिमावो भंडारनायके सरकारने संयुक्त राष्ट्राकडे महावेली गंगा नदी खोरे आणि कोरडवाहू क्षेत्रांची पाहणी करण्यास विशेष निधीतून मदत देण्यासाठी विनंती केली. १९६४ मध्ये निधी मंजूर करण्यात आला. हे सर्वेक्षण दोन टप्प्यात करण्यात आले : १९६५ ते १९६७ च्या दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण प्रकल्प क्षेत्राच्या प्रत्यक्ष भेटी देऊन मास्टर प्लॅनची रूपरेषा विकसित करण्याच्या हेतूने सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी जलस्रोतांचे आराखडे केले गेले. १९६८ मध्ये दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण योजनेसाठी तीन टप्पे निश्चित करून तपशीलवार डिझाइन तयार करण्यात आले.
पहिला टप्पा १९७६ मध्ये पूर्ण झाला. ज्यामध्ये पोलगोल्ला आणि बोवटेना येथे वळण बांध, उकुवेला येथे ४० मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प आणि सुमारे ५२,७०० हेक्टर जमिनीला सुधारित सिंचनाची सोय यांचा समावेश आहे.[४]
गतिमान महावेली कार्यक्रम
[संपादन]महावेली विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी मूळ योजनेनुसार केली असती तर १९७५ पासून पुढची ३० वर्षे सुरू राहिली असती. तथापि, १९७७ मध्ये नव्याने नियुक्त जे. आर. जयवर्धने सरकारने हा वेग वाढवून ६ वर्षांच्या मुदतीत तो पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार एक्सलरेटेड महावेली प्रोग्राम (एएमपी) १९७७ मध्ये मास्टर प्लॅनच्या पुनरावृत्तीसह कार्यान्वित करण्यात आला. ज्यामध्ये कोटमले, व्हिक्टोरिया, मदुर ओया, रांदेनिला या चार मुख्य धरणांसह इतर १२ प्रकल्पांचा समावेश होता. १९७९ मध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी श्रीलंकेच्या संसदेने ‘महावेली प्राधिकरण, श्रीलंका’ची स्थापना एका अध्यादेशाद्वारे केली.[४]
चित्रदालन
[संपादन]-
उंचावरून दिसणारे दृश्य
-
व्हिक्टोरिया धरणाच्या तेल्देनिया या बुडीत क्षेत्रातील दृश्य
-
कातूगस्तोता या सखल प्रदेशातील दृश्य
संदर्भ
[संपादन]- ^ "Horton Plains National Park". International Water Management Institute. August 5, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 November 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|dead-url=
ignored (सहाय्य) - ^ "Longest Rivers In Sri Lanka". worldatlas.com. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka's biggest river basin development project". Sunday Times. २४ ऑक्टोबर २०१०. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ a b c "Master Plan". Mahaweli Authority of Sri Lanka. 2018-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.