महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी हीची स्थापना इ.स. १९८२ साली तत्कालीन आमदार व हिन्दी लेखक-पत्रकार डॉ. राममनोहर त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.परंतु आवश्यक सरकारी अनुदान, कर्मचारीवर्ग आणि कार्यालय न मिळाल्याने संस्था काहीही काम करू शकली नाही. कंटाळून त्रिपाठींनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे यांच्या अध्यक्षतेखाली इ.स. १९८६ मध्ये अकादमीचा पुनर्जन्म झाला.

इतिहास[संपादन]

कामकाज[संपादन]

पुरस्कार योजना[संपादन]

महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने यापूर्वी प्रदान केलेले पुरस्कार
  • काव्यासाठी संत नामदेव पुरस्कार :
    • हरि मृदुल(मुंबई) यांना ’सफेदी में छुपा काला’ या काव्यरचनेसाठी
    • डॉ.ज्योति व्यास(अमरावती) यांना ’चॉंद पिघल रहा था’ या काव्यरचनेसाठी
    • विनोद कु.उडके (कवी दीप-नागपूर) यांना ’मौन के अधुरे अर्थ’ या काव्यरचनेसाठी
  • लघुकथेसाठी मुन्शी प्रेमचंद पुरस्कार :
    • नरेंद्र कौर छाबडा(औरंगाबाद) यांना ’एक और गांधारी’ या कथेसाठी
    • कविता शनवारे(नागपूर) यांना ’मेरा चंदोरा बह गया’ या कथेसाठी
    • जीवितराम सेतपाल(मुंबई) यांना ’पोस्टकार्ड’ या कथेसाठी (मृत्युपश्चात)
  • निबंधासाठी आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार :
    • शशिकांत नेत्रपाल शर्मा(नागपूर) यांना ’मखमली जूते’साठी
    • राजेंद्र पटौरिया(नागपूर) यांना ’नेकी कर जूते खा’साठी
    • कमला सेतपाल(मुंबई) यांना ’चक्रव्यूह’साठी
  • नाट्यरचनेसाठी विष्णुदास भावे पुरस्कार :
    • डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’साठी
  • कादंबरीसाठी जैनेंद्र कुमार पुरस्कार :
    • अनीता मनोहर नाईक यांना ’कन्यादान’ या कादंबरीसाठी
  • बालसाहित्यासाठी सोहनलाल द्विवेदी पुरस्कार :
    • प्रेमा शुक्ल(अकोला) यांना ’जीवन के मुस्काते क्षण’साठी
    • वृंदा भुसारी(नागपूर) यांना ’टफ़ी ने बचाई राजू की जान’साठी
  • पत्रकारितेसाठी बाबूराव विष्णु पराडकर पुरस्कार :
    • विनोद तिवारी(मुंबई) यांना ’फ़िल्मपत्रकारिते’साठी
    • राजेंद्र पांडे(मुंबई) यांना ’पटकथा कैसे लिखें’साठी (मृत्युपश्चात)
  • समीक्षेसाठी आचार्य नंददुलारे बाजपेयी पुरस्कार :
    • उषा कीर्ति राणावत(मुंबई) यांना ’प्रभा खेतान का औपचारिक संसार’साठी
    • सत्यदेव त्रिपाठी(मुंबई) यांना ’तीसरी ऑंख का सच’साठी
  • अनुवादासाठी मामा वरेरकर पुरस्कार :
    • प्रतिमा दवे शास्त्री(मुंबई) यांना ’आनंदी गोपाल(गद्य)’साठी
    • किरण मेश्रामी(नागपूर) यांना ’ऐलान(पद्य)’साठी
  • हिंदी भाषा, भाषाशास्त्र, किंवा हिंदी व्याकरणासाठीचा पं.महावीर प्रसाद द्विवेदी पुरस्कार
    • अंबादास देशमुख(औरंगाबाद) यांना ’प्रयोजन मूलक हिंदी अधुनातन आयाम’साठी
  • जीवनप्रेरक साहित्यासाठी काका कालेलकर पुरस्कार
    • कोणीही नाही.
  • लोकसाहित्यासाठी फणीश्वरनाथ रेणु पुरस्कार
    • कोणही नाही.
  • हिंदीत विज्ञानविषक किंवा तांत्रिक विषयावरील लेखनासाठी डॉ.होमी भाभा पुरस्कार
    • कोणीही नाही.

प्रकाशने[संपादन]