Jump to content

महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात भटक्या जमाती (Nomadic Tribe) (NT- भ.ज.) प्रवर्गातील जमातींची संख्या (२८+१०) ३८ असून या संवर्गास २.५% आरक्षण आहे.

सामाजिक सर्वेक्षण

[संपादन]

भटके-विमुक्तांच्या आर्थिक व सामाजिक समावेशनासाठी:

  • स्वातंत्र्यापूर्वी-
  1. जेल्स (Jails) समिती (१९१९),
  2. स्टार्ट समिती (१९१४),
  3. सिमींग्टन (Symington) समिती (१९२७),
  4. सायमन कमिटी (१९२८),
  5. मुन्शी समिती (१९३७).
  1. डॉ.कृष्ण भिमराव आंत्रोळीकर समिती (१९५०),
  2. LB थाडे समिती (१९५९),
  3. BD उर्फ भाऊराव दगडूराव देशमुख (१९६४),
  4. मुटाटकर समिती (१९९२),
  5. भिकुदास रामजी इदाते समिती (१९९७) व

भारत सरकारने स्थापिलेल्या:

  1. BN लोकूर समिती (१९६५),
  2. पी.के. मिश्रा समिती (१९७१),
  3. बिंदेश्वरी प्रसाद मंडल आयोग (१९८०),
  4. बाळकृष्ण रेणके आयोग (२००६) व
  5. भि.रा. ईदाते आयोग (२०१५).


  • 09/04/1965: रोजी श्री. बीडी देशमुख समितीच्या निष्कर्षानुसार VJNT आरक्षण 4% देण्यात आले.
  • 23/05/1974 रोजी GAD resolution No. BCC - 1072-J नुसार पदोन्नतीत आरक्षण VJ/NT समाजास लागू. (as they were similarly situated with SC & ST and did not have adequate representation in the State Services).
  • ४ ऑगस्ट, १९९२ रोजी ४% वाढवून ६ टक्के करण्यात आले, कारण धनगर समाजाला २९ क्रमांकावर समाविष्ट करण्यात आले होते.
  • २३ मार्च, १९९४: वंजारी समाजाला भटक्या जमातीचे फायदे लागू करण्यात आले.

संवर्गातील जमाती

[संपादन]

२३ मार्च, १९९४ नुसार २.५% आरक्षण.

क्रमांकजमातीतत्सम
1बैरागी(गोसावी)बावा, नाथ-गोसावी
2बेलदारओड, मुस्लिम बेलदार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नरकापु, तेलंगा, तेलगी, पेंटरेड्डी, बुकेकरी, मुस्लिम राज, मुसलमान राज, मुस्लिम मेमार, मेमार, मुस्लिम-गवंडी (शा.नि.दि.30 जानेवारी, 2014प्रमाणे समा‍विष्ट), कुमावत (शा.नि. दि.०४ जून २०१९ नुसार समाविष्ट)
3भराडीअ) बाळ संतोषी ब) किंगरीवाले क) नाथबावा ड) नाथ जोगी, गारपगारी इ) नाथपंथी डवरी गोसावी ई) नाथ, जोगी, नाथपंथी उ) डवरी
4भुतेभोपे
5**(वगळले)-----------चलवदी, (कांजार भाट)
6चित्रकथी------------
7गारुडीसापगारुडी (मुस्लिम धर्मियांसह)
8घिसाडी (लोहार)घिसाडी, घिसाडी लोहार किंवा गाडी-लोहार किंवा चितोडी लोहार, रजपूत लोहार, पांचाळ लोहार, खाती, खातवाढई, जिनगर, चितोडीया-लोहार, चितारी/जिनगर (शा.नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
गोल्लागोल्लेवार, गोलेर, गोलकर
१०गोंधळी--------कदम गोंधळी, रेणुराई गोंधळी, खिवारी गोंधळी.
११गोपाळअ) (गोपाळ) भोरपी ब) खेळकरी (गोपाळ) (शा.नि.दि. 4 सप्टेंबर, 2014 प्रमाणे सुधारित जात)
१२हेळवे12) हिलव
१३जोशीअ) बुडबुडकी, ब) डमरुवाले, क) कुडमुडे-(जोशी), ड) मेंढगी, इ) सरोदे, सरोदी, फ) सहदेव-जोशी, म) सरवदे, ह) सरोदा
१४काशी कापडी-----------
१५कोल्हाटीडोंबारी
१६मैराळअ) दांगट, ब) वीर
१७मसनजोगी1) सुदगडसिद्ध, 2) मपनजोशी, 3) शारदाकार/ शार्दाकार/शारदाकाळ/बालासंतु
१८नंदीवालेतिरमल
१९पांगुळ------------
२०रावळराऊळ किंवा रावळयोगी
२१सिक्कलगरकटारी, सेक्क्लगर (मुस्लिमधर्मिय), शिख-शिकलीगार, शिख-शिकलीकर, कातारी शिकलगार, मुस्लिम शिकलगार, शिकलीगार, शिकलीगर, शिकलगार, शिकीलगर, श्किलकर, शिकलीकर, शिकलकरी, सिकलकर, सिकलीकर, सिकीलगर, सिकीलकर, सिकलीघर, सिक्कलकर, सिकलीगर, सिकलगर, सिक्कलीगर, सायकलगर, सैकलकर, सैकलगर, कातारी-शिकलकर (शिकलीकरी) हिंदू धर्मीयांसह (शा.नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
२२**वगळले---------- (ठाकर–रत्‍नागिरी जिल्हा)
२३वैदू-----------
२४वासुदेव---------
२५भोई1) झिंगा भोई 2) परदेशी भोई 3) राजभोई 4) भोई 5) कहार 6) गोडिया कहार 7) धुरिया कहार 8) किरात 9) मछुआ 10) मांझी 11) जातिया 12) केवट-तागवाले 13) ढीवर 14) धीवर 15) धीमर 16) पालेवार 17) मछेंद्र 18) नावाडी, भोई नावाडी, तारु-नावाडी 19) मल्हार 20) मल्हाव 21) बोई 22) गाढव भोई 23) खाडी भोई 24) खारे भोई 25) ढेवरा 26) भनारा, भनारी, भनारे 27) निषाद 28) मल्ला 29) मल्लाह 30) नाविक 31) ओडा 32) ओडेवार 33) ओडेलू 34) बेस्तार 35) बेस्ता 36) बेस्ती 37) बेस्तालू 38) भनार 39) भूरे (शा.नि.दि 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
२६बहुरुपीअ) बोहरशी, ब) बहुरुपिया, क) भोरपी, ड) रायरंध्र, इ) अय्यार व अय्यारी
२७**वगळले ठेलारी (धुळे, नाशिक, जळगाव, व औरंगाबाद जिल्हयात)आता भटक्या जमाती(क) मध्ये समाविष्ट
२८ओतारीअ) ओतनकर, ब) ओतकर, क) वतारी, ड) ओझारी इ) वतकर, वतकरी, वतनकर, वतोकर, ओतकरी, ओतोकारइ वतोकार
२९*वगळलेधनगर, आता स्वतंत्र प्रवर्ग (भटक्या जमाती-क)
३०*वगळलेवंजारा (स्वतंत्र प्रवर्ग)
३१कडकलक्ष्मीवालेमरीआईवाले,मरगम्मावाले (१४ फेब्रुवारी,२००१ पासून)
३२गिहारा / गहरा-------
३३गुसाई / गोसाई-----------------
३४गारुडीसापवाले व जादूगर,मुस्लिम मदारी
३५भारतीय इराणी---------------
३६गवळी समाजगवलान, ग्वालवंश,(१५/६/२००८) गोपाल-गवळी, गवळी-गोपाल (शा.नि.दि. 1 जुन, 2004 प्रमाणे सुधारित जात), मुस्लिम-(गवळी)
३७दरवेशीअस्वलवाले, वाघवाले-शाह (मुस्लिमधर्मीय)
३८बागडी(शा.नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)?

हे सुद्धा पहा

[संपादन]